STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

मातृत्वाचं ओझं (मुक्तछंद)

मातृत्वाचं ओझं (मुक्तछंद)

1 min
805




अविष्कार

सुखद जाणिवेचा अन्

स्त्रीजन्माच्या पूर्णत्वाचा.

एक निरागस अंकुर

स्वतः त फुलवून

जीवापाड जपण्याचा.

होय.

प्रत्येक स्त्रीला आहे अधिकार मातृत्वाचा.

पण.....................

पण हेच लेणं आईपणाचं

लादलं असेल जबरीनं तिच्यावर तर........

तर गुदमरुन जाते ती.

घायाळ होते ती

अंगावरुन फिरणाऱ्या किळसवाण्या नजरांनी

आणि अनुत्तरित होते

तुमच्या-आमच्या बोचक प्रश्नांनी.

तरीही सुरु असते तिची धडपड

कोवळ्या जीवाला वाचविण्यासाठी

मातृत्वाच्या लेण्यासाठी

पण समाजाला मान्य नसतं तिचं आईपण

अन् तिलाही नकोसं होतं तिचं बाईपण.

मग ती संपविते स्वतःला

सोबतच त्या निष्पाप जीवाला

खरा गुन्हेगार राहतो बाजूला

हकनाक भोगावी लागते शिक्षा

त्या भाबड्या मातृत्वाला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational