माणूस......
माणूस......
चुकीला चुक, चोरीला,चोरी ,असत्या असत्य,
खोटयाला खोट,गर्वाला गर्व,मत्सराला मत्सर,
वअहंकाराला अहंकार मानण्याची कुवत जेव्हा येते
तिथून मानव म्हनुन जगण्याची खरी सुरुवात होते.
नाहीतरी चोरी लपविणयाची कला माणसाला प्रामाणिक ठरविते.
सभ्यतेच्या गोष्टी उजेडात करणारयांच्या
असभ्यपणा अंधारात खाचुन मिसळलेला असतो.
ठासुन मत मांडणारे सरावलेले असतात
खोटयाला खरे सिद्ध करतात.
आरेरावीने चढलेला आवाज खरंतर आपलीच भीती लपवित असतो.
अन शांत राहूनही राग व्यकत करतात माणसं.
आयुष्य खुली किताब ठेवणयाचे धाडस करतात किती माणसं.
लपवावे लागेल असे कृत्य का करतात माणसं
एक खोटे पचवायला हजारदा पुन्हा खोटंच बोलतात मानसं.
खोल समुद्रासारखी मन घेऊन फिरतात ..
माणसं काय काय दडवून वावरतात माणसं.
