माणूस...!
माणूस...!
माणसाची व्याख्या करणं
मला संयुक्तिक वाटत नाही
माणूस म्हणजे काय
हे नेमके समजत नाही
पदर आचार विचारांचा
एकेक उलघडावा तर
अंत होत नाही
अनंताची व्याप्ती काही गवसत नाही
इतकं मात्र नेमकं कळत
माणूस झाल्यावर माणूस कळत
तेंव्हा मात्र मानव जातीच
मोठं नवल वाटत
काही नाहीं असा मानव नाही
काही आहे असा दानव नाही
मानवाच्या आसनी दानवाच्या
मधला फरक मात्र कळत नाही
बरखा धारी बरेच दानव
मानव म्हणून जीवनी भेटतात
तेंव्हा मात्र मानवाचीते
व्याख्याच बदलून टाकतात
एकच क्षण मानवाला
त्राग्यात दानव बनवून टाकतो
दानवाचा मानव होण्यास मात्र
सारा जन्म खर्ची पडतो
माणूस आहोत म्हणून
माणूस राहूनच जीवन सार्थकी लावावे
त्रागा करुनी नारीवरती मग
उगाच दानव म्हणुनी का जगावे....?
