STORYMIRROR

Aarya S

Children

4  

Aarya S

Children

माकडदादाचा मोबाईल

माकडदादाचा मोबाईल

1 min
352

एकदा माकड दादाने 

घेतला नवीन मोबाईल, 

दाखवू लागला फोन तो 

जो कोणी येईल जाईल


फोन घेऊन फिरू लागले 

ऐटीत माकडदादा, 

हाती बघण्या कुणा ना देई 

झाली ग ची बाधा


नवा फोन तो लांबून बघण्या 

सगळ्या सांगून झाले ,

ताठ मानेनी फोन घेऊनी 

आपुल्या घरी निघाले

 

मंकु मंकी करत होते 

ऑनलाईन अभ्यास, 

नवा मोबाईल मला हवा 

हाच दोघांना ध्यास


होऊ लागली रस्सीखेच 

नवीन मोबाईलची, 

बघून त्यांना दादाचा होई

श्वास ही वरती खालती


खेचा खेचीत खाली पडला 

नवीन मोबाईल तो, 

काचही फुटली बटणे तुटली 

राही ना कामाचा तो


काय करावे सांगा त्यांनी 

सुचले काही ना त्यांना, 

ऐट कशी ही भारी पडली 

कळले हे दादांना 


गर्वाचे घर खाली येते 

याद राही ही बात ,

बसून राहिले माकड दादा 

लावून डोक्या हात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children