STORYMIRROR

Shivam Madrewar

Tragedy Fantasy Children

3  

Shivam Madrewar

Tragedy Fantasy Children

एका कवीशी बोलत होती कविता

एका कवीशी बोलत होती कविता

2 mins
282

नद्या, सरोवर व तलाव सर्व आटले,

हिरवळीच्या जागाच ईथुनतिथे मिटले,

आज ह्या दुःखी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


आज मोठमोठे यंत्रमानव तयार झाले,

परग्रहवासींसोबत मानवाने संबंध बांधले,

आज ह्या अनोळख्या जगाकडे पाहता,

एका कवीशी बोतल होती कविता.


घारेच्या मानेवरती कावळा चोच मारतो,

तरी सुध्दा कावळात बेशुद्ध पडतो,

आज ह्या मतलबी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


प्रचंड लावा बाहेर टाकून ज्वालामुखी फुटतो,

प्रण्यांचा विचारही न करता जंगलात वणवा पोटतो,

आज ह्या क्रोधी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


फक्त सोण्याचाच खाणी मानव शोधतो,

हिऱ्यामोतींसोबत तो देवाण-घेवाण करतो,

आज ह्या लेखी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


पृथ्वीने मानवास सर्वकाही दिले,

पण मानवाने फक्त प्रदुषन पसरवले,

ह्या अन्यायकारक जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


सर्व गोष्टी कविताने स्वत: पाहिले,

ते पाहतांना तिच्या डोळ्यात अश्रू आले,

मानवाचे जुलमी भविष्य पाहता,

एका कवीशी बोलती होती एक कविता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy