STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Classics Children

3  

शुभांगी कोतवाल

Classics Children

प्रवास

प्रवास

2 mins
135

कुणी कामानिमित्त तर कुणी पर्यटक म्हणून

कुणी शाळा - कॉलेज ची सहल म्हणून 

तर कधी नातेवाईकांना भेटण्यासाठी

लग्न - मुंज असे समारंभ अशा निमित्ताने

प्रवास हा जीवनातील न टाळता येणारा 


कधी आवड म्हणून तर कधी जरुरी म्हणून

प्रत्येक जण बस, गाडी यांनी प्रवास करतच असतात

क्वचित कधी विमानात बसून, क्रुझने जलवाहतूक

असे निरनिरळया प्रकारे आपण करतो प्रवास


जीवन हाही एक प्रवासच आहे नाही का 

जसं गाडीत बसल्यावर सहप्रवासी भेटतात 

आपापल्या ठिकाणी गाडी थांबली की उतरतात

प्रत्येकाचा प्रवास पुढे सुरू राहतो न थकता

नवीन ओळखी नवीन चेहरे निरनिराळे प्रवासी


कुणाला रोज प्रवास करणे भाग असते नोकरीनिमित्त

ऊन असो पाऊस असो किंवा कडकडीत थंडी

वाहतूक ही चालूच राहते प्रवास चालू राहतो

वाहनचालकांना जागरूक रहावंच लागतं

प्रवाश्यांना आपापल्या ठिकाणी वेळेवर पोहोचवण्यासाठी


लहानपणी आईवडील भावंडांबरोबर सुट्टीतला प्रवास

मामाच्या गावी जाण्याची ती मज्जा व गंमत

मोठे झाल्यावर कधी शिक्षणा निमित्त तर

कधी नोकरीच्या शोधात अनेक कारणांनी प्रवास


कधी तो कंटाळवाणा वाटणारा प्रवास तर कधी

नैसर्गिक सौंदर्य पाहात आरामदायी वाटणारा प्रवास

बरच काही शिकवून देणारा अनुभव वाढवणारा प्रवास

कधी सुखद आठवणी देवून जाणारा प्रवास 


प्रवास हा अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या जीवनात

त्यामुळेच तर नातेवाईक आप्त भेटतात 

व्यापार उद्योग व नोकरीत उन्नती घडवून देणारा

बरंच काही नविन शिकवून जाणारा प्रवास 


कुणाला असते प्रवासाची खूप आवड तर

कुणाला असतो त्याचा खूप कंटाळा 

जगाच्या पाठीवर कुठेही फिरण्याची कोणाला असते हौस

निरनिराळ्या नैसर्गिक सौंदर्य असणाऱ्या ठिकाणी भेट

तर कधी धार्मिक स्थळांना मंदिरांना भेट व दर्शन

प्रत्येकाचा प्रवासाचा हेतू हा निरनिराळा 


तरुण कुतूहल सहल व नवीन साहस म्हणून 

तर कधी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी म्हणून

तर कधी नोकरीच्या इंटरव्ह्यू निमित्त 

असा हा जीवनातील प्रवास नेहमी चालू असतो


सोयी - गैरसोयी असा हा निरंतर प्रवास चालतो

आणि कदाचित दूर प्रवास करून आल्यावर 

घरची , घरच्या जेवणाची व कुटुंबीयांची व जीवनात

 त्यांचं असलेलं महत्व कळत असतं ..........


कधी प्रवासात काही अडचणी येता , सहप्रवासी 

एकमेकांची मदत करून माणुसकी जपून 

वेळ निभावून नेतात काही सुखद अनुभव देवून जातात 

तर कधी त्या विरुध्द वागणारे प्रवासी ही भेटतात 

जसा जीवनाच्या प्रवासात कधी कडू तर कधी गोड आठवणी , अनुभव येतात 

प्रवासातच माणसाची व माणुसकीची खरी परीक्षा व प्रत्येकाची खरी ओळख पटली जाते 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics