STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational Children

3  

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational Children

समुद्र

समुद्र

2 mins
179

निसर्गातली एक विलक्षण रचना, समुद्र 

अमर्यादित , विशाल क्षितिजा पलीकडेही

ज्याला पाहताना आपली नजरही अपुरी वाटावी, 

अशी ही आनंददायी , सुंदर , आल्हाददायी कृती !


समुद्र , ज्याच्या गर्भात काय - काय दलले आहे , 

वर वर दिसणारी वाळू , शंख , शिंपले , गारगोटे ,

त्याचे पाणीच मूळात कुठे हिरवे तर कुठे निळे,

कुठे पांढरे शुभ्र, पारदर्शी , भुरे - राखोडी पाणी 


अनेक जीव - जंतू , लहान मोठे मासे व मगर , 

काही सुंदर , काही विचित्र वनस्पती व शेवाळे , 

विविध रंग , प्रकृती , आकाराचे प्राणी जीव 

अनेक रहस्य तळाशी असलेले समुद्राचे तळ, 


त्या उंच - उंच उठणाऱ्या समुद्राच्या लाटा , 

आणि पुन्हा स्थिरावून संथ वाहणारे पाणी 

एक भव्य समुद्री वाहतुकीचा रस्ता , 


त्यातून त्या चालणाऱ्या होड्या , जहाज ,

क्रुझ आणि पाणडूब्या व युद्धनौका, 

प्रवासी वाहतूक आणि देश सुरक्षा ,

मोठल्या बोटी व विमान वाहक नौका ,


मासे पकडून , विक्री करून निर्वाह करणारे कोळी ,

अश्या ह्या समुद्राचे किती आणि कसे फायदे , 

समुद्रकाठी असणारे बीच व चौपाट्या ,


सायंकाळी प्रवासी व इतरही लोकांची ,

जमणारी गर्दी, आनंदाने फिरायचे , 

खेळायचे , विविध प्रकारच्या खाण्याचा आस्वाद ,

शहराच्या दग्दगीपासून दूर असे शांत स्थळ ,


निसर्ग , वाहतुकीच्या प्रदूषणापासून मुक्त जागा, 

मोकळ्या आणि शुद्ध हवेचे ठिकाण ,

हे सर्व त्या अफाट वाहणाऱ्या समुद्रा मुळेच ,


सर्वदूर वाहणाऱ्या नद्या ही मिळतात समुद्रात ,

इतक्या नद्या आपल्यात सामावून घेतो समुद्र ,

आणि तरीही स्वतःचा पाण्याचा गुणधर्म तोच ,

का समुद्राचे पाणी खारट , कशामुळे ? 

सर्वांना पडणारा आणि न उलगडणारा प्रश्न !


गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी , 

असंख्य भक्तगण , दर्शर्नार्थी, प्रेक्षक 

यांनी गजबजून जाणारा समुद्र किनारा , 

मोठाल्या मूर्तींना स्वतः मधे सामावून घेणारा , 

व सर्वाँना आनंद देणारा असा हा समुद्र ! 


कधी कधी उठणाऱ्या , उसळणाऱ्या व

रौद्र रूप घेणाऱ्या त्या भयानक लाटा , 

आतून व बाहेरून निर्माण होणारे समुद्री वादळ, 

व सुसाट वाहणारा वारा, तोही ह्या समुद्राचाच भाग !


विशालतेचा शिक्का मिळवणारा , एकमेव प्रमाण

 असणारा , विशालतेचा दुसरा पर्याय नसणारा ,

 म्हणूनच एखाद्याला "समुद्रसारखा विशाल हृदयी' उपमा म्हणून वापरला जाणारा , असा हा समुद्र,


 सागर , सिंधू , रत्नाकर , अर्णव , उदधी 

अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा तो


तुम्हाला - आम्हाला न उमजनारा , पण तितकाच

 आल्हाददायी व निसर्गाचा अविभाज्य भाग असलेला असा हा समुद्र ! !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract