शाळेचा पहिला दिवस
शाळेचा पहिला दिवस
शाळेच्या पहिल्या दिवसाची गमंत नारी होती. इवल्याशा हातानी बॅग उचलायची, रडत रडत आईला बिलगायचे, सगळे असे का वागत हे ना कधी समजायचे. खाऊ बिस्कीटाची चालुच मला हो दाखवायचे. शाळेत सोडून आई भुूरर्र व्हायची. माझे डोळे मात्र तिला शोधायचे. रडण्याला कधी साथ पावसाची असायची, पण तो रडतो ही गोष्ट ना उलगडायची. मधल्या सुट्टीत मुलात मी रमायची. त्यांचा खाऊ कधी मी चोरी करायची. आठवले काही मला, ते हिसकावून घेत बाई. ते परत घेता कांगावा मी करायची. रुपीला हळूच चिमटा घ्यायची मीच वरुन बाईला तिचे नाव सांगायची. दोन वेण्याचा होता माझा अवतार, ठुमक ठुमक मी बागडायची. शाळा सुटल्यावर आई यायची बिलगुन तिला मी पुन्हा रडायची. रडता रडता तक्रार मी बाईची करायची. बाईचे घर ऊन्हात बांधू आई नेहमीच म्हणायची. देवा हे बालपण पुन्हा देना रे आई बाबांची संगत ती पुन्हा देना रे, इवलीशी मी ना उरले, ना उरले इवलेसे पण पुन्हा आनंदाचा मेवा चाखु देणा रे.
