STORYMIRROR

kishor zote

Children

3  

kishor zote

Children

अंकाचे गाणे

अंकाचे गाणे

1 min
15.3K


एक तो म्हणतो

एकत्र येवूया

मिळून चला रे

आपण खेळूया.

दोन हात पहा

टाळी वाजवू या

घडी घालून हो

गप्प ते बसूया.

तीन चाके रिक्षा

त्यात हो बसूया

शाळेत जातांना

टाटा तो करूया.

चार पाय पहा

जनावरांना या

चारा पाणी मग

त्यांना हो देवूया.

पाच वाती करू

समई लावूया

पाहुण्यांचे चला

स्वागत करूया.

सहा धावा काढा

सिक्सर मारूया

क्रिकेटचा खेळ

सेंच्युरी करुया.

सात रंग पहा

रंगांची दुनिया

इंद्रधनूची चला

कमान पाहुया.

आठ दिशा मोजा

मित्रांना सांगूया

दिशांचा तो खेळ

नावे ओळखूया.

नऊ रत्न असे

शोध तो घेवूया

बिरबलाची ती

हुशारी शिकूया.

दहा बोटे मग

हात ते जोडूया

झुकून पुढे ते

वंदन करूया.

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children