Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

sairam sonawane

Children Stories Inspirational Others

3  

sairam sonawane

Children Stories Inspirational Others

वाचा पुस्तक, सुधारा मस्तक

वाचा पुस्तक, सुधारा मस्तक

2 mins
185


पुस्तक वाचणे हा एक असा छंद आहे की 

जो छंद आपण अंगीकृत केल्याने 

आपल्या वर्तमानासाठीच नव्हे तर आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी ,अर्थात भविष्यात येणाऱ्या

अडचणींसाठी एक 'ढाल' म्हणून कार्यकरत असते.....


  आजच्या या धावपळीच्या जीवनात कोणालाही

पुस्तक वाचण्याची सवड नाही आहे.

 आपण जर एक विचार केला

आजवर जितक्या ही यशस्वी मुलाखती आपण बघितल्या तर जे यशस्वी व्यक्ती होऊन गेले

ते नेहमी सांगत असतात की 

पुस्तक वाचना व्यतिरिक्त इतर कुठलेही असे साधन नाही की जे आपणास पात्र ठरवू शकतात


आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक घरात प्रत्येक मुलाकडे मोबाईल पाहावयास मिळतो....

शासन 1ली ते शिक्षण होई पर्यंत का पुस्तकाचा वापर करण्यास सांगतात?

 सामान्यपणे एक विचार जर केला तर असं लक्षात येईल की ह्या क्रमिक पुस्तकांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि आपण स्पर्धा परीक्षा देण्यास गेलो तर तेथील प्रश्न 

वाचून आपल्याला खूप आनंद होईल की याचा अभ्यास मी केला आहे.

यावरून लक्षात येते की 

पुस्तक आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात

आपलं संपूर्ण जीवन आणि परिस्तिथी बदलण्याची 

प्रबळ शक्ती फक्त आणि फक्त पुस्तकातचं असते....


 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 

आपणास "वाचाल तर वाचाल" हा संदेश दिला

का कारण त्यांना माहीत होते, ते पुस्तकाचे महत्व 

त्यांना तर योग्य पुस्तक योग्य वेळी मिळायचे देखील नाही

तरी देखील त्यांनी आज पुस्तकाचे ज्ञान प्राप्त करून आपणास कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी मदत करणारे "संविधान" दिले जे की सर्वोत्कृष्ट मानले जाते.

 

आजकाल सर्वांना थिएटर मध्ये चित्रपट पाहण्यात मजा येते.

Lockdown च्या काळात कोणाला बोर वाटायला लागलं

की लगेचच लॅपटॉप, मोबाईल समोर बसून तासांतास गेम खेळण्यात वेळ घालवला पण कोणी पुस्तक वाचले नाही आणि आपल्या ज्ञानात भर टाकली नाही.....


वाचनाची आवड कमी झाल्यामुळे

अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अनुत्तीर्ण होताना दिसत आहेत.....आपणास आपला देश हा प्रगतीपथावर न्यायचा असेल तर 

आजच्या पिढीला पुस्तक वाचन हा छंद असणे 

आणि पुस्तकांशी मैत्री करणे गरजेचे आहे


 पुस्तकांशी होईल मैत्री

यशाची मिळेल खात्री


याप्रमाणे खरोखर यशाची खात्री मिळेलच


संत तुकाराम महाराजांच्या 

"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने”.

या ओवी प्रमाणे 

तुकाराम महाराज शब्दांना रत्ने म्हणतात

आनि सोने चांदी ,रत्ने यासोबत शब्दांची तुलना होत नाही


 पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे

आपल्या वाचनात प्रगती होते 


 त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो.....

वाचा पुस्तक , सुधारा मस्तक



Rate this content
Log in