Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Children Stories Classics Inspirational

3  

Vimal Patkari

Children Stories Classics Inspirational

शब्दमोत्यांची गुंफण

शब्दमोत्यांची गुंफण

2 mins
205


अ ' अ ' अमृताते पैजा जिंके अशी

आ ' आ ' आई माय मराठी आमुची !!

इ ' इ ' इमारत उंच उंच दिसे

ई ' ई ' ईडलिंबू मोठा मोठा असे !!

उ ' उ ' उखळात आई कांडी दाणे

ऊ ' ऊ ' उसाचा रस गोड लागे !!

ए ' ए ' एकात्मता आम्हा शिकवी

ॲ ' ॲ ' ॲक्टींग बाळ छान करुन दाखवी

ऐ ' ऐ ' ऐश्वर्या सुरेल गाणी गाई !!

ओ ' ओ ' ओढ शब्दमोत्यांची लागता

ऑ' ऑ' ऑल इज वेल अशी साद येई मना !!

औ ' औ ' औत शेतात चालवी बळीराजा 

अं ' अं ' अंजू अनुस्वार शीक आता

'अ: ' अ: म्हणजे अ पुढील टिंबांना विसर्ग म्हणतात !!

क ' क ' कपात सारे चहा,कॉफी घेती

ख ' ख ' खव्याचा पेढा प्रसादात देती !!

ग ' ग ' गवत दिसे हिरवेगार

घ ' घ ' घराच्या भिंती ' चार !!

च ' च ' चमच्याने आम्ही खातो पोहे

छ ' छ ' छत्री ही आम्हा उपयोगी पडे !!

ज ' ज ' जहाज पाण्यावर डुले 

झ ' झ ' झबल्यात बाळ छान खुले !!

ट ' ट ' टरबुजात लाल रंग दडे 

ठ ' ठ ' अक्षर ठसा मनावर ठसे !!

ड ' ड ' डमरू डमडम वाजे

ढ ' ढ ' ढगातून पाऊस टपटप पडे !!

ण ' ण ' बाण क्षमताधिष्टीत नेम धरी

त ' त ' तारा शाळेला जाई !!

थ ' थ ' थवा उडे पक्षांचा आकाशी

द ' द ' दरवाजातून प्रवेश हा होई !!

ध ' ध ' धरणात खूप पाणी साठे

न ' न ' नळाद्वारे भरती पाणी सारे !!

प ' प ' पप्पा आणतात पपई

फ ' फ ' फणस रसाळ गरे देई !!

ब ' ब ' बदक करी क्व्यकक्व्यक

भ ' भ ' भटजी मंत्र म्हणती पाठ !!

म ' म ' मनात होवून आनंदी

य ' य ' यमू अक्षरगीत गाई !!

र ' र ' रथाला हरणांची जोडी 

ल ' ल ' लवंग उड्या मसाल्यात मारी !!

व ' व ' वरदहस्त लाभण्या यशाचा

श ' श ' शब्दमोतिंचे मोल जाणा !!

ष ' ष ' षटकोनाला असती सहाकोन 

स ' स ' समईला सात घरे छान !!

ह ' ह ' हरिण चपळगती पळे

ळ ' ळ ' बाळ पांगुळगाडी खेळे !!

क्ष ' क्ष ' क्षमता हसत खेळत प्राप्त करून 

ज्ञ ' ज्ञ ' ज्ञान ज्ञानू घेई आनंदानं !!

ऋ ' ऋ ' ऋतू वसंत राज

ङ ' ङ ' ङ ला वेगळ्या उच्चाराचा साज !!

स्वरांची असे पहा व्यंजनांना साथ

जपू ठेवा आपणही हा ' शब्दमोतिंचा ' खास !!


Rate this content
Log in