STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others Children

3  

Sarika Jinturkar

Others Children

आठवणीतली शाळा

आठवणीतली शाळा

2 mins
540

आज थोडं मागे वळून पाहिलं  

तर शाळेचे ते दिवस आठवले  

एक शिक्षिका म्हणून माझ्या वर्गातील विद्यार्थी  

माझ्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण भाग आहे हे आज नव्याने पुन्हा 

एकदा मनाला जाणवले 


 आज आठवला तो मावळणारा दिवस 

 नेहमीप्रमाणे मावळत होता तोच 

 लॉकडाऊन होणार शाळा बंद होणार  

असा काहीसा नाद कानात घुमत होता  

शांत गंभीर चेहरा जणू हसत होता 


स्थिर झाल्या दाही दिशा 

चैतन्य ही जणू अचल झाले 

हरवूण गेले निळाईत आकाश

 क्षितीजही काजळून गेले😌  


बघता-बघता मुलांची परीक्षा रद्द झाली 

मन लावून अभ्यास करणाऱ्या  

विद्यार्थ्यांची थोडी नाराजगी झाली

 अन् अभ्यास न करता छानपैकी यावर्षी 

आपण पास झालो म्हणून काही मुलं जाम खुश झाली

 उन्हाळा सारखी ढिगभर सुट्टी ही मुलांना मिळाली  


दीर्घकाळ भेटलेल्या सुट्टीला ही दीर्घकाळाचीच रजा असते जुन्या आठवणीच्या जोडीला नव्या क्षणांची मजा असते  

शाळेचा पहिला दिवस सदैव उत्सुकतेत पहुडलेला असतो अन सुट्ट्या संपल्याचा आनंद 

मनामनात वाढलेला असतो ☺️ 


गेला उन्हाळा आला आता पावसाळा

 पण अजून सुरू नाही झाली शाळा  

मुलांना वाटले होते भेटेल नवे सोबती 

वर्गात सगळे मिळून करू खूप मजा मस्ती🤗  


शाळेच्या पहिल्या दिवसाची मजाच वेगळी असायची 

नव्या मॅडम नवे शिक्षक हाती देणार आमच्या गणवेश 

नवे पुस्तक सर्व काही नवनवीन मुलांसाठी अशी गोष्ट सगळी असायची 🤗


 परंतु बाह्य परिस्थितीमुळे शाळा मला ही 

थोडी वेगळीच भासली बघतांनाही ती  

थोडी वेगळीच दिसली 

 कारण डिजिटल फळ्यावर ऑनलाइन शाळा भरली

 या ऑनलाईन शाळेमुळे मुलांची

 मोबाईलशी चांगलीच गट्टी जमली  

मुलांना लागला युट्युब चा लढा  

आम्ही शिक्षक पण म्हणू लागलो आता

 सगळे ऑनलाईनच हजेरी लावा


मोबाईलच्या स्क्रीनवर मुले मैदान गाजवत आहे  

अभ्यासाच्या नावाने काहीजण मोबाईल मधील गेम खेळून दिवसरात्र जागत आहे 

 आता वाजेल का घंटा  

शिजेल का खिचडी

खरंच लक्षात तरी राहील काय यांना

 इयत्ता आणि तुकडी


 फळा आणि खडू पण लागलेत रडू 

विचारत आहे प्रश्न कधी होते शाळा सुरू 

 छम छम छडी चा पण नाही राहिला धाक 

ढीगभर सुट्टी आणि परीक्षाही माफ 

सुरू झाली जेव्हा पासून ऑनलाइन शाळा  

मुलांना लागला आहे मोबाईलचा लळा  


शाळेतली ती पहिलीवहिली गंमत नाही राहिली  

अशा शाळेला कंटाळून कधी होणार शाळा सुरू मुलेही आता ओरडू लागली  


पुन्हा एकदा शाळेत जायचय 

धावत जाऊन रोजच्या बाकावर बसायचं

रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचं 

नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर

 छान अक्षरात आपलं नाव लिहायचं  

कितीही तुटका असू दे दोघांच्या बाकावर

 तिघं मित्र म्हणून बसायचं हे सगळं आठवत म्हणू लागली

 

शाळा होती तेव्हा वाटायचं ही शाळा लवकर संपावी आणि आज असे वाटते आठवणीतली ती शाळा पुन्हा एकदा भरावी पुन्हा एकदा भरावी 

ऑनलाईन शाळेपासून लवकरच आपली सुटका व्हावी 


 पुन्हा नव्याने एकदा शाळेत जाऊन  

शाळेच्या त्या दिवसांची मजा पुन्हा अनुभवावी

अन् मित्र-मैत्रिणी सोबत भरलेली ती शाळा 

पुन्हा कधी न सुटावी कधी न सुटावी... 😊 


Rate this content
Log in