Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Children

4.6  

Sarika Jinturkar

Children

माझे बाबा

माझे बाबा

2 mins
677


संसाराला घडवणारं आगळावेगळ व्यक्तीमहत्त्व  

ज्यामुळे आहे घराचं अस्तित्व 


परमेश्वराकडून मिळालं जीवनाची गोडी वाढवणारं  

आपल्याला मिळालेलं अनमोल असं गिफ्ट म्हणजे बाबा..


 आईप्रमाणेच आपल्या आयुष्यात बाबांच प्रेम एवढं अमुल्य आहे.. 

बाबाला चार शब्दात मांडणे तर कठीणच आहे...

बाप लेकीचं नातं तर काही वेगळेच आहे...

माझे बाबा...  


जन्मताच कुशीत घेऊन लाडिक तळहाताचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा करून ज्यांनी मला लहानाच मोठं केलं..  

माझे पहिले बोबडे बोल, मी टाकलेले पहिले पाऊल,

 माझे लाडिक वागणे. माझी घरभर पैंजणांची छुमछुम ..

हे सगळ पाहून सुखावणारे 

माझे बाबा 

बोट धरून मला चालायला शिकवणारे,

 माझ्या हट्टासाठी कधीकाळी घोडा होणारे  

नाजुक कळीसारखा माझा सांभाळ करणारे,  


जागच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळेच्या वेळेवर काम नाही झाले तर चिडणारे , वेळ प्रसंगी काळजी घेणारे तेवढच कौतुक करणारे

 अनेकदा कठोर, पण हळवेच व्यक्तिमत्व...

 शिस्तप्रिय असे माझे बाबा...

 संस्कार देणारी आई संस्कार जपणारे माझे बाबा  

संयम देणारी आई पण खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे माझे बाबा  

माझे बाबा एक झाडच अबोली 

 जणू अव्यक्त माऊली...  

शांत, प्रेमळ..आपल्या भूमिकेवर ठाम असणारे 

माझ्या ध्येयसिद्धीसाठी आधार बनणारे  

स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणारे  

तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपणारे  

कष्ट, मेहनत करून सर्वांच्या सुखासाठी झटणारे  

आयुष्यातले कच्चे दुवे पक्के करायला शिकवणारे 


 लेकीला माहेरी उंबरठा ओलांडून सासरी जातांना पाहतांना ढसाढसा रडणारे

 दिल्या घरी सुखी राहा, म्हणतांना मनातून खचणारे  

शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणारे 

 माझे सर्वस्व म्हणजे माझे बाबा


 लग्नानंतर मुलीचे नाव बदलले तरी तिचे बाबा बरोबरचे नाते कधीच बदलत नाही 


 ती शेवटपर्यंत तिच्या बाबाची छोटी परीच असते 

 मन मोकळं करण्यासाठी एक हक्काची जागा म्हणजे माझे बाबा... लेक जर घराचे सौख्य असेल तर सौख्याचे पावित्र बाबा असतात... म्हणतात ना आई घराच मांगल्य आहे तर बाबा घराचा आधार ..अगदी बरोबर आहे... म्हणूनच मला त्यांचा अभिमान आहे .. कारण त्यागाचा आणि करूणेचा महासागर म्हणजे माझे बाबा आहे  

आकाशातील तारे जसे मोजता येत नाही तशेच बाबाचे प्रेम शब्दात सांगता येत नाही...

प्रत्येक क्षणी आधार देणारे 

माझी प्रत्येक चूक मनात ठेवून माझ्यावर खूप प्रेम करणारे

 माझे बाबा...

 आज एकच मागणं देवाला 

खूप खूप सुखी ठेव माझ्या बाबाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children