Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Children Stories Others

3  

Vimal Patkari

Children Stories Others

शोध बालपणाचा !! ( काव्य )

शोध बालपणाचा !! ( काव्य )

2 mins
214


साऱ्या लेकरांना देवा पावशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ?

शाळेत गुरुजी तोंडपाठ म्हणून घ्यायचेत पाढे

चुकलो तर छमछम छडी हातावर मारायचे

त्या छमछम छडीचा प्रसाद आम्हा देशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

खेळायचो खेळ आम्ही चेंडू लगोरी 

आबा-धोबा खेळायची मौजभारी

खेळायची गोडी आम्हा लावशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

पावसात भिजायचो आम्ही सारे सवंगडी 

ओहोळ-नाल्यात सोडायचो कागदाची होडी

त्या होडीची हौस परत पुरवशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

हौसेनं खेळायचो झिम्मा-फुगडी 

मांडायचो रोज आम्ही भातुकली 

त्या भातुकलीच्या खेळात पुन्हा रमवशील का ? 

हरवलेलं बालपण देशील का ? !!

दगड मारून पाडायचो बोरं, चिंचा नी कैऱ्या 

खेळायचो खेळ भारी सुरपारंब्या 

फळझाडांच्या बागेत आम्हा नेशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

तळ्यात-मळ्यात चोर-शिपाई खेळ खेळता

आठवे मधेच खेळ विटी-दांडू चा

संग साऱ्या खेळांचा देशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

मधल्या सुट्टीत घेवून चिंचा, आवळे,अमोन्या 

मज्जा येई वाटावाटी करुन खातांना

त्या मैत्रितील निरागस भाव देशील का?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

गोट्यांचा खेळ सारी मुले खेळता

मौज भारी वाटे त्यांच्या गोट्या पळवता

गोट्यांचा खेळ पुन्हा खेळवशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

भोवरा फिरवण्याची मौज न्यारी

हातावरी घेता तो गुदगुली करी 

त्या भोवऱ्याची गिरकी पुन्हा दावशील का ?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

साजरे करतांना सारे सण-उत्सव

भरून येई आनंदानं साऱ्यांच मन 

खूप सारा आनंद आम्हा देशील का?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

आला असता सण अक्षयतृतिया

झाडाला बांधला जाई झुला

त्या स्वच्छंदी झुल्याची हौस पुरवशील का ?

हरवलेलं बालपण देशील का? !!

संध्याकाळी चालवायचो आम्ही सायकल 

विविध खेळांची रोज लावायचो शर्यत 

त्या शर्यतीतील खिलाडू वृत्ती देशील का?

हरवलेलं बालपण देशील का ? !!

डोळ्यांवर पट्टी बांधून खेळायचो आंधळी कोशिंबीर 

टाळी वाजवून हुलकावणी देण्या वाटे गमतीशीर

चोरुन हळूच बघायची संधी आम्हा देशील का ?

हरवलेलं बालपण देशील का? !!

गोलाकार बसून आम्ही सारे एकत्र 

खेळ खेळायचो हरवलय मामाचं पत्र

मामाचं पत्र साऱ्यांना शोधून देशील का ? 

हरवलेलं बालपण देशील का? !!

सांजवेळी शुभंकरोतीम्हणुनी

म्हणायचो तोंडपाठ रोज उजळणी

वरदानात चांगल्या सवयी आम्हा देशील का ?

हरवलेलं बालपण देशील का? !!

ऐकतांना गोष्ट आजी आजोबांची 

गंमत येई आकाशीच्या चांदण्या मोजण्याची

चंद्र लिंबोणीच्या झाडामागील दावशील का ?

हरवलेलं बालपण देशील का? !!

छंद जरा मोबाइल,टिव्ही चा दूर सारुनी

जीवनातील सुख-आनंद सांग समजावुनी

आम्हा आमचे बालपण शोधून देशील का?

बालपणीचे सुख आम्हा देशील का?


Rate this content
Log in