भगवान बुद्ध
भगवान बुद्ध
शाक्य वंशी राजा रानी
शुद्धोधन, महामाया |
पोटी जन्मले सिध्दार्थ
मानवास उद्धाराया ||१||
झाले निधन आईचे
त्याच्या सातव्या दिवशी |
सांभाळण्या पुढे आली
रानी गौतमी मावशी ||२||
सांगे आसित राजाला
बाळ आहे मोठी आत्मा |
राजा होईल महान
किंवा होईल महात्मा ||३||
मग बाळाला राजाने
सर्व दिले राज सुख |
होऊ नये निरागस
जगी पाहूनच दुःख ||४||
भार्या आली यशोधरा
सिद्धार्थच्या जीवनात |
पुत्र राहूल जन्मला
घरी हर्ष मावेनात ||५||
दिसे वृद्ध, रुग्ण, प्रेत
झाले विचलित मन |
मग संन्यासी पाहून
झाले वैराग्य निर्माण ||६||
एका पावसाळी रात्री
गेले कुटुंब सोडून |
ज्ञान प्राप्तीसाठी केला
तप अन्नास त्यागून ||७||
त्यांनी लावली समाधी
पिंपळाचे झाड़ाखाली |
सहा वर्षाची साधना
बुद्धत्वाने फळा आली ||८||
ज्ञानप्राप्तीनंतर ते
झाले बुद्ध भगवान |
दुःख दूर करण्यास
केले उपदेश दान ||९||
उपदेशामध्ये त्यांनी
दिले आर्यसत्ये चार |
आष्टांगीक मार्ग आणि
पंचशीलचे विचार ||१०||
