Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradnya Khadakban

Others Children

3  

Pradnya Khadakban

Others Children

जुन्या आठवणींची पाने उलगडताना

जुन्या आठवणींची पाने उलगडताना

2 mins
354


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

मज गवसलं सुखदुःखाच्या ओंजळीच पान...

कधी ओसंडून वाहणारं सुख, 

कधी दुःख देणारी सुनामी लाट, 

आयुष्य जगता जगता अनुभवाची शिदोरी भेटली, 

आयुष्याची खरी चव अनुभवातच चाखली, 

भेटत गेली आयुष्य जगायची शिकवण, 

घडत गेली व्यक्तिमत्त्वाची जडणघडण...


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

झाली संत तुकारामांच्या ओवीची आठवण...

लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!!

ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार!!

विचारांच्या श्रुंखल्यातच रममाण मी, 

मज गवसलं लहानपणीच पान, 

सापडल माझं निरागस मन,  

जबाबदारी नसलेलं चिंतामुक्त तन...


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

मज गवसलं बालपणीच पान...

तरळल्या जुन्या आठवणी त्या पानात, 

माझं मन गेलं माझ्या गावात, 

माझं गाव म्हणजे माझी आठवण, 

आयुष्यभराची मनात साठवण, 

चैत्राच्या सुंदर पावलाने पालवी फुटावी, 

तशी मनाची सुंदर घडण बालवयातच व्हावी...


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

मज गवसलं कोऱ्या पाटीच पान...

नजरे समोर तरळला शाळेचा वर्ग, 

कोऱ्या पाटीत अनुभवला ज्ञानाचा दर्प, 

शेणाने सुद्धा सारवलय शाळेच अंगण,  

अगदी जिव्हाळ्याच माझ्या शाळेच पटांगण,

आठवण सखीसोबत खाल्लेल्या चिंच, बोर, आंबट गोळ्यांची,  

बोटात घालुन खाल्लेल्या पिवळ्या नळ्यांची, 

किती ते वेड मन धावायच कापसाच्या म्हातारीमागे, 

शाळेच्या मधल्या सुट्टीत धाव घ्यायचो घराकडे...

 

जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

मज गवसले सर्व सण त्या पानात...

श्रावणसरी बरसताच लागायची सणांची चाहूल, 

गौरी-गणपती, नवरात्र, दीपावली सणांनी 

उजळून जायचा घरातील माहौल, 

संक्रातिचा तिळगुळ वाटायला प्रत्येक घरी जायची हौस, 

सखी सोबत घ्यायचो मैदानी खेळातली मौज, 

होळीच्या सणाला लपाछपी खेळायचो, 

रंगाची उधळण करून आनंद घ्यायचो... 


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

मज गवसलं उन्हाळ्याच्या सुट्टीच पान... 

एप्रिल-मेची सुट्टी म्हणजे घरात पाहुण्याची वर्दळ,

कैरी आणि करवंदासाठी करायचो जंगलाची सफर, 

पत्ते आणि गप्पाटप्पामध्ये बेभान होऊन जायचो, 

गप्पाच्या नादात तहानभुक सगळंच विसरायचो, 

भातुकलीच्या खेळामधली रंगतच भारी, 

चुलीवरच्या खिचडीची चवच न्यारी... 


जुन्या आठवणींची पाने उलगडताना... 

पाने कधी संपली कळलेच नाही...

विचारांती एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, 

आयुष्य जगण्याची तऱ्हा होती वेगळी, 

आता चढवलाय आधुनिकतेचा साज,  

बिनधास्त आयुष्य जगण्याचा नाज, 

आयुष्यातले जुने क्षण परत येत नाही, 

गप्पांची मैफिल आता भरतच नाही, 

गप्पांची जागा आता मोबाईलने व्यापले, 

आयुष्य जगण्याची पद्धतच बदलले...


Rate this content
Log in