माझ्या स्वाभिमानी मनात
माझ्या स्वाभिमानी मनात
एक अहंकार दडलाय
त्याला तुझ्या प्रेमाची
साथीची गरज आहे
त्या विलोभनीय चांदरातीतले
स्वप्न नाही डोळ्यात
किंबहुना
अंधारात चाचपडणा-या दुःखितांचे
स्वप्न, जीवनगाणे घेऊन जगतेय
तू मला साथ देशील काय?
हा प्रश्न मी तुला करायलाच नको
पण!
दुनियादारीच्या या रगाड्यात
मी पाठीमागे पडून कार्य
तसेच राहू नये याची खंत
मनाला जाळते.
म्हणून तुला माझे साकडे?
