STORYMIRROR

Jayshree Hatagale

Inspirational

4  

Jayshree Hatagale

Inspirational

माझं-तुझं

माझं-तुझं

1 min
26.9K


 

 

कोणास ठाऊक?

कुठल्या क्षणी मरण येईल

माझं-तुझं म्हणता-म्हणता

मात्र, जगणं राहून जाईल

 

हे जे माझं-तुझं म्हणतो

ते सोबतही येत नाही

पण, माणूस मात्र माझं-तुझं

केल्यावाचून रहात नाही

 

सगळं इथेच राहणार

हे प्रत्येकाला माहित असतं

तरीही संपत्तीच्या मोहापासून

कोणाचंच मन अलिप्त नसतं

 

द्वेष, मत्सर करण्यात

उभं आयुष्य निघून जातं

आणि आवडत्या व्यक्तीवर

प्रेम करणं राहून जातं....

 

जेव्हा हे सगळं कळतं

तेव्हा वेळ निघून गेलेली असते

सारं काही इथेच सोडून जाण्याची

वेळ जवळ आलेली असते

 

काय लागतं जगण्यासाठी?

जेमतेम असलं तरी भागतं

फक्त, सुंदर आयुष्याचं स्वप्न

खुल्या डोळ्यांनी पहावं लगतं..

 

डॉ.जयश्री अ. हातागळे

कोंढवा पुणे.

मो.८७९३३६०३१६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational