STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

4.5  

Yogita Takatrao

Inspirational

माझी मराठी

माझी मराठी

1 min
1.4K




माझी मराठी मायबोली

संपूर्ण जगात तिची किर्ती


दुरवर नावलौकिक तिचा

आसमंतात पसरलेला


अमृततुल्य हया मराठीने

दिले दिग्गज मंडळी


पु.लं,कुसुमाग्रज,विं.दा

अनेक मान्यवर साहित्यिक


हिरे ,माणिक आणि मोती

मराठी भाषेचे आपुल्या


अविट गोडीची मराठी

अस्सल खऱ्या सोन्याची


बोलण्यास जेवढी मधाळ

ऐकावयास मधुर सद्गुणी


जपुया वारसा मराठीचा

आपल्या सांस्कृतिक बोलीचा


मराठी अभिमानाचा पताका

विश्वात साऱ्या फडकवुया


करुया आदर सन्मान तिचा

गजर आपल्या मराठीचा


मिळून सारे मराठी बांधव

करुया जयजयकार तिचा


मान उंचावूया मराठीची

शान वाढवुया या भाषेची


आहे मराठीची थोर महती

सामर्थ्यवान शिवबां सारखी


भिमासारखी शक्तीशाली

कीर्तने,भारूडांनी सजलेली


भजन,कवितांनी श्रृंगारलेली

ऐतिहासिक कथांनी भारलेली


अशी ही अनमोल ,बहुगुणी मराठी

आहे अमुल्य ठेवा आपुल्या पाशी


जतन करूया वारसांसाठी

सत्कार तिचा व्हावा पिढी न पिढी


तुमची ,आमची ,आपल्या सर्वांची

ही मराठी ,माझी प्रिय मराठी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational