माझी लाडकी
माझी लाडकी
कन्या सुकुमार
जणू गुलाबाची कळी
शोभते खळी
गाली
ओठ पाकळ्या
बोल बोबडे बोलती
गुपिते खोलती
मनीचे
डोळे पाणीदार
करिती कसे लुकलुक
बघती टुकटुक
सभोवार
केस कुरळे
मजेत रुळती भाळी
कानाच्या पाळी
कुजबूजे
अवखळ भारी
करी कामात लुडुबुडु
चाले दुडुदुडु
घरभर
लाडकी छकुली
माझी सानुली कन्या
जीवनी सुन्या
आनंदघन.
माझी परी
माझ्या काळजाचा तुकडा
न्याहाळीतो मुखडा
नित्य.
