माझे मित्र : बाबा
माझे मित्र : बाबा
वयानुसार दिसू लागले
गुण समंजसपणाचे,
तेव्हा जाणू लागले महत्व
मी माझ्या बाबांचे,
आईने जन्म दिला
आयुष्य बघण्यासाठी,
पण बाबांनी धडा दिला
आयुष्यात पुढे जाण्यासाठी,
कधीच प्रयत्न नाही केला
बाबांचे मन जाणण्याचे,
पण तेच तर खरे मित्र
आहेत आयुष्याचे,
ते दिसायला आहेत
काटेरी फणसासारखे,
पण हृदयात प्रेम
मात्र गोड गर्यासारखे,
जेव्हा संकटांचा वारा
वाहत येतो पुढे,
तेव्हा कणखर मनाचे
बाबा असतात माझ्या मागे,
कमावतात पैसा कष्टाचा
घाम गाळून गाळून,
शरीर तर त्यांचे खूप थकते
काम करुन करुन,
मला सुखी ठेवण्यासाठी
स्वतः दुःख झेलतात,
ह्याच पद्धतीने बाबा
माझ्यावर प्रेम करतात,
तुमच्याबद्दलचं प्रेम कधीच
व्यक्त नाही केलं,
म्हणून त्या प्रेमाला
आज कवितेचं रूप दिलं.
