लतादीदी
लतादीदी
लतादीदी
मंगेशकर
कुटूंबाची शान
सम्राज्ञीचा मान
ज्ञानाची भर ... १
भारत रत्न
तुला पुरस्कार
संगीत संस्कार
केलेस यत्न ... २
दिनानाथांनी
संस्कारीत केले
संगीताचे झेले
सुसंवादानी ... ३
देशवेदेशी
आवाज पोचला
प्रसिध्द जाहला
जगाच्या वेशी .... ४
सार्या भगिनी
हृदयनाथांच्या
गान संस्कारांच्या
गीत संगिनी.... ५
देवा पुढली
समई विझावी
तशी गमवावी
गती लागली ... ६
मृत्युने तव
झाले नुकसान
गमावले भान
रिकामी कव ... ७
दीदी म्हणोनी
फोडलाच टाहो
जनतेने हा हो
उर भरोनी ... ८
घे पुन्हा जन्म
भारत देशात
गायन वेशात
रहा आजन्म ... ९
देते तुजला
मी ग श्रध्दांजली
शब्द काव्यांजली
दुःख मजला ... १०