लता मंगेशकर
लता मंगेशकर
मंगेशकर घराण्याला
लाभले गुणी सारे पुत्र
सरस्वतीची आराधना
संगीताचे घेई हाती सूत्र...१!
लताताई सर्वांत मोठ्या
लाभला कोकिळाचा गळा
लाखो गाणे गायिले सुंदर
फुलवी संगीताचा मळा...२!
अभिमान आहे भारताला
लताताईला मिळे भारतरत्न
भाग्यवान किती माता पिता
लाभले त्यांना हे कन्यारत्न...३!
लताताई सम व्यक्तीमत्व
नाही होणार या जगात
आदर्श वाटतो जगताला
अशी मुलगी यावी घरात...४!
साधी राहणी उच्च विचार
गायन क्षेत्र चढविला साज
निरामय ,निरोगी आयुष्य
हीच शुभेच्छा देते आज....५!