लावणी...!
लावणी...!
डाव्या डोळ्याची पापणी उडता
त्याची आठवण होते येता जाता..।।धृ।।
त्याच्या बोलीचा रुबाब हा मोठा
डोईवरी बाई भरजरी फेटा
शेला धरुनी चाले स्वारी
हातामधी घेऊन घुंगुर सोटा ।।१।।
लाल पानाचा मुखी तोबरा
जीव होतो बाई घाबरा घाबरा
अंगात शोभतो नक्षी सदरा
हात घाली बाई माझ्या पदरा।।२।।
लगट त्याची बाई लै लै भारी
आठवता येतो क्षणात दारी
मिठीत त्याच्या सुखाची शिदोरी
जाऊ नको म्हणते मी त्याला माघारी...।।3।।
