कविता
कविता
कविता म्हणजे
कवीच्या मनातील भाव
कविता म्हणजे
त्याला लेखनातून मिळालेली वाव
ती ऐकून प्रेक्षक देतात तळ्याचा ताव
तोच असतो कवी साठी आनंदाचा ठाव........
कविता बनवतो शब्दा शब्दाला जोडूनी
वाचता क्षणी सर्वांचे मन घेतो वळूनी
कविताला साथ असते भाव आणि प्रेमाची
ते वाचून लोक होतात एकमेकाची
तेव्हा बरसात होते टाळ्यांची
तीच असते खरी ओळख कवितेची........
कविता म्हणजे......
मनाच्या भावना लिहता कल्पनाच्या लेखणी
चार ओळी लिहता लिहता कविता होते देखणी
कविता लिहण्यासाठी हाती घेतो लेखणी
मनातील सर्व विचार त्यावर लिहीन
विचार करतो नेहमीं कविता लिहावी नवी
तेव्हाच मला सर्वजण म्हणतील कवी.....
