STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

कवि आणि कवितेचं नातं

कवि आणि कवितेचं नातं

1 min
14.1K


कवी  आणि कवितेच काय आहे नातं?

कविता म्हणजे धान, कवी असतो जातं

कवितेची किंमत त्यांनाच कळते ...

जया अंगी रसिकता अन संवेदनशील मन

कविता म्हणजे कवीचा अंतर्मनाचा संवाद

अंतर्मुख मनाचा तो एक पदर असतो

चिंतन, मनन, जोडीला असतेच मनस्वी मन 

स्फूर्ती बरोबर मन उत्तेजित होते तेव्हा जन्मते कविता

कवी आणि कवितेचं काय असत नातं?

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना 

दुसऱ्याच दुःखही त्याला स्वतःच वाटत कारण

त्याच्या ठायी मानव विषयीची अपार करुणा  

कविता ही कवितेची असते बोलकी बाहुली 

त्याच्या इशाऱ्यावर ती असते नाचत

तो होतो अस्वस्थ जेव्हा कविता नाही सुचत 

कवी म्हणजे शरीर कविता असते आत्मा

शरीरविना आत्मा नाही, आत्म्याविना शरीर 

कोणी निदा, कोणी वंदा, तो लिहतोच कविता 

कविता त्याचा श्वास असते, तिच्याविना तो नाही 

कुणी काहीही म्हटले तरी कवी मात्र लिहीत राहील ... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational