कुणी असही बनावं
कुणी असही बनावं
शिंपी कुणी बनावं
तुटलेली मने शिवण्यासाठी
वायरमन कुणी बनावं
अबोला धरणार्या दोघांचे
कनेक्शन जोडून देण्यासाठी
ऑप्टिशयन कुणी बनावं
लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन
नीट करुन देण्यासाठी
कलाकार कुणी बनावं
चेहर्यावरच्या हास्य रेषा
रेखाटण्यासाठी
गवंडी कुणी बनावं
दोन शेजार्यांमध्ये
उत्तम सेतू उभारण्यासाठी
माळी कुणी बनावं
सुंदर विचार पेरण्यासाठी
प्लंबर कुणी बनावं
तुंबलेल्या मनांना मोकळं
करण्यासाठी
शास्रज्ञ कुणी बनावं
एकमेंकाबद्दलची ओढ
शोधण्यासाठी
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
शिक्षक कुणी बनावं
एकमेकांशी संवाद
घडविण्यासाठी
ज्ञानामृत वाटेवाटेवर
मुखी पाजण्यासाठी