STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Fantasy

2  

Abasaheb Mhaske

Fantasy

कुणास ठाऊक कसं ? पण ...

कुणास ठाऊक कसं ? पण ...

1 min
14.2K


कुणास ठाऊक कसं ? पण

कळत - नकळत, आकस्मिक घडतं

हळवं मन समाधिस्त होऊन

सिद्धहस्त लेखणीतुन जगणं साकारत.


टिपण्यास सभोतालच बरंच काही

लेखणी कडाडते, झंकारते, सरसावते

भावनांचा कल्लोळ आकार घेतो अन

अव्यक्त भावनांना शब्दरूप येते.


दोन- चार शब्द सांडतात अलगद

फेर धरून नाचतात चौफेर आनंदाने

परस्परांशी घट्ट नातं विणतात

सांगू पाहतात ह्रदयीचे ती स्पंदने.


तर कधी निष्प्रभ होतो मी टिपताना.

सभोवतालचं दुःख, यातना अमंगल सारं

तो आनंद सोहळा कसा वर्णावा ?

मोर मनीचा धुईधुई नाचतो बेभान होऊनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy