Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Drama Inspirational

3  

Gaurav Daware

Drama Inspirational

कष्टाळू कामगार...

कष्टाळू कामगार...

1 min
258


अरे कामगार आहे रे मी कामगार

नाही कोणाच्या कष्टाचा भागीदार

स्वतः कमवून जीवन जगतो थोडंफार

नाही मारत कुणाच्या हक्काचे तुकडे चार


जीवन जगत असतांना नाही करत फेरफार

जीवन म्हणजे कष्ट याची जाणीव आहे यार

लबाडी लाच याची ओळख नाही मला फार

पण चार पैशाची किम्मत मी ठेवतो शानदार


थोडं हसत थोडं बनतो दुःखात भागीदार

कुटुंबासाठी जगतो मी पुन्हा वारंवार

लेकराचे डोळे जेव्हा आशेने बनतात धारदार

तेव्हा मात्र काळीज माझं होत पाणीदार


कोणी टोचून बोललं तर वाईट वाटत अलवार 

तेव्हा मी दोन कानाचा उपयोग करतो क्षणवार 

कामाचं ऐकून बाकी सोडून देतो मी थोडंफार 

पण कष्टाची बाजू नेहमी घेतो बनून ललकार


कामगार म्हणून जगतो मी अलगत अलवार

जणू कष्टाचा चढवलाय माझ्यावर दागिना अलंकार

थोडं तांबट पण आयुष्य आहे खरंच मजेदार

जेव्हा कष्टाची भाकरी सुख देते पुन्हा वारंवार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama