क्षण आठवांचे
क्षण आठवांचे
दिस मोरपंखी
एकत्र भेटीचे
मैत्री घट्ट वीण
क्षण आठवांचे ।।
खेळ विट्टीदांडू
ठिकरी लगोरी
मुक्त अंगणात
मुले रमणारी ।।
कैरी चिंच बोरे
मिळूनी तोडणे
रानमेवा सारा
लपून चाखणे ।।
शाळेच्या वर्गात
एका बाकावर
जोडी ही आमची
स्वार यशावर ।।
फुलपाखरांच्या
संगे बागडणे
सुगंधी क्षणांना
हृदयी जपणे ।।
