बालकविता
बालकविता
1 min
199
आमचा मनित
फारच हट्टी
रुसला की करे
सर्वांची कट्टी
खायला हवे त्याला
बिस्किट नि कुरकुरे
वरण भात खाताना
नेहमी कुरकुर करे
टूणटूण उड्या मारी
चपळ हरणासारखा
तुरुतुरु पळत राही
भित्र्या सश्यासारखा
बोलू लागला की
गडी थांबतच नाही
रडू लागला की
कुणाचे ऐकतच नाही
पाहुणे येता
कोणी घरात
लपून बसतो
मधल्या दारात
सायंकाळ होता
आळस देई
आईच्या कुशीत
झोपी जाई
