STORYMIRROR

Umaji Patil

Inspirational Children

3  

Umaji Patil

Inspirational Children

हे वीर शिवाजी राजे!

हे वीर शिवाजी राजे!

1 min
302

तुज हातांत होती युग-प्रवर्तकाची शक्ती, 

हृदयात होती आस जोखडमुक्त महाराष्ट्राची.


क्षात्रतेज अन् स्वाभिमान तू पुनर्जिवित केले,

पारतंत्र्य भूमीतून असंख्य लढवय्यै उठविले.


भाले-बरचे अन् तलवारींसह उभे ठाकले अनेक वीर, 

शत्रूमुक्त केली भूमी प्रसंगी देऊन वीरांचे ही शीर.


मनी चाड होती धर्माची अन् देशाची, 

म्हणून लढले शत्रू संगे पर्वा न करता जीवाची.


वेळ पडताच अनेकदा जीव लावला पणाशी,

काळ ही भ्याला शूरत्वाशी, वीरत्वाशी.


महाराष्ट्राचे महानेतृत्व तू पराक्रमी,

असंख्य मौल्यवान रत्ने उधळीतो गौरवार्थ तुजवारी.


लढवैय्या तू मराठमोळा, महाराष्ट्र-भूमीपुत्र, 

अढळ प्ररेणा बनून रहा आमुच्या हृदयात सर्वत्र.


तोफांनाही अजिंक्य ठरले ज्यांचे बरचे अन् भाले, 

त्या मावळयांचे हे वीर शिवाजी राजे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational