STORYMIRROR

Umaji Patil

Inspirational

4  

Umaji Patil

Inspirational

हे वीर शिवाजी राजे!

हे वीर शिवाजी राजे!

1 min
275

तुज हातांत होती युग-प्रवर्तकाची शक्ती, 

हृदयात होती आस जोखडमुक्त महाराष्ट्राची


क्षात्रतेज अन् स्वाभिमान तू पुनर्जिवित केले,

पारतंत्र्य भूमीतून असंख्य लढवय्ये उठविले


भाले-बरचे अन् तलवारींसह उभे ठाकले अनेक वीर, 

शत्रूमुक्त केली भूमी प्रसंगी देऊन वीरांचे ही शीर


मनी चाड होती धर्माची अन् देशाची, 

म्हणून लढले शत्रू संगे पर्वा न करता जीवाची


वेळ पडताच अनेकदा जीव लावला पणाशी,

काळ ही भ्याला शूरत्वाशी, वीरत्वाशी


महाराष्ट्राचे महानेतृत्व तू पराक्रमी,

असंख्य मौल्यवान रत्ने उधळीतो गौरवार्थ तुजवारी


लढवय्या तू मराठमोळा, महाराष्ट्र-भूमीपुत्र, 

अढळ प्रेरणा बनून राहा आमुच्या हृदयात सर्वत्र


तोफांना ही अजिंक्य ठरले ज्यांचे बरचे अन् भाले, 

त्या मावळ्यांचे हे वीर शिवाजी राजे!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational