STORYMIRROR

sarika k Aiwale

Children

3  

sarika k Aiwale

Children

लेक ग माझी...

लेक ग माझी...

1 min
226

लेक ग माझी

सोनपरी ती

सावली मायेची     

सय ती बापाची

लेक माझी ती

वेलीवरची

कळी सोनुकली

अशी ती छकुली

साय दूधाची

नजरेतुनी

तिच्या ओझरते

माया पाझरते

मनातुनी

आली ती घरा

लक्ष्मीच्या पावली

आईची सावली

मृदू ती स्वरा

अशी ती लेक

गुणी माझी पोर

सासर असे थोर

नितीने नेक

लेक ग माझी

उगवत्या सूर्याची

छबी किरणाची

सोनुली माझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children