STORYMIRROR

सुरेश पवार

Children Stories

3  

सुरेश पवार

Children Stories

देवकीनंदन

देवकीनंदन

1 min
260

देवकीनंदन जन्माला आला,

आठवे पुत्र ठरतील कर्दनकाळ,

कंस मामा चा करी संहार,

बाळ लल्ला मामाचे झाले काळ.।।।१।।।


सारी लीला श्रीकृष्णाची,

सुचविले वसुदेवरायाला युक्ती,

घेऊन निघाले बाळ श्रीकृष्णाला,

आई यशोदेची अपार भक्ती.।।।२।।।


तुरुंगाचे दरवाजे सारे उघडले,

वाट दाखवी वसुदेवरायाला,

कान्हा निघाला गोकुळाला,

अफाट संकट आले प्रवासाला.।।।३।।।


महिमा आहे सारी तुझीच,

रास लीला बालवयातच करी,

गौळणीला छेडती रोज,

मडकी फोडून दूध दहीची नासाडी करी.।।।४।।।


नाना विधीने चमत्कार दाखविले,

आहे साऱ्या सृष्टीचा दाता,

गौ रक्षण करुनिया,

साऱ्या जगाचा भाग्य विधाता.।।।५।।।


Rate this content
Log in