कागद
कागद
कागद कोरा
रेखीव रेषा
लिहावी त्यावर
कोणतीही भाषा
रंगबिरंगी छटांचे
मिळती कागद
हस्तकला करावी
त्यासंगे अलगद
विमान बनुनी
वाऱ्यासंगे उडे
प्रेमरूपी संदेशवाहकाचे
कामही आवडे
कागदी होड्या
मुले करीती
पाण्यावर कश्या
संथ तरंगती
झाडे आहेत
कागदाचे मूळ
कागद चुरगाळण्याचे
थांबवा खूळ
