बाप!
बाप!
मुलांच्या सुखाचं गणित मांडणारा माणूस म्हणजे बाप।
ज्याच्या चेहऱ्यावर मुलांसाठी नेहमी हसू असतं तो माणूस म्हणजे बाप।।
ज्याचा प्रत्येक सेकंद मुलांच्या भवितव्यासाठी असतो तो माणूस म्हणजे बाप ।
मुलांच्या सुखासाठी जो अविरत कष्ट करतो तो माणूस म्हणजे बाप ।।
चांगल्या सवयीसाठी जो कधीतरी मुलांना रागावतो तो माणूस म्हणजे बाप ।
ज्याला विश्रांती म्हणजे काय असत हे ठाऊकच नसतं तो माणूस म्हणजे बाप ।।
वरून कठोर पण आतून गोड असणारा माणूस म्हणजे बाप।
ज्याला स्वतःसाठी काहीच नको असत पण पोरांसाठी सगळं खरेदी करायचं असत तो माणूस म्हणजे बाप ।।
