जायचे शाळेला
जायचे शाळेला
वाटतंय आतातरी ही
उघडेल माझी शाळा
बाई नि सरांनी लगेच
भरावा लिहूनीच फळा
पाहून अभ्यास माझा
पाठीवर फिरवी हात
केली साऱ्यांनी आता
अशा संकटावरी मात
हूंदडावे मैत्रीणींसवेही
गळ्यात घालूनी गळा
खेळून नाचत बागडत
पहाया इवल्यांचा मळा
खुप वाटते आता मला
खेळावे मागच्या बागेत
नसे सॅनिटायझर मास्क
ना बसावे थोड्या जागेत
कितीतरी महिने झालेत
ना पाहिला शॉपिंग मॉल
सिनेमा नाटकही नाहीच
गाठला लग्नाचाही हॉल
जावे आजीकडे गावाला
भेटायचे कडकडून मला
कधी टळेल कोरोनाचीही
प्राणघातक असली बला
कपिला गाय नि वासरू
पहात असती तिथे वाट
रेल्वेतून न्याहाळायचाय
वळणावळणाचा हा घाट
हिरवळ झाडी नि मळे
पाहायचेत डोळे भरून
गावी मोत्या नि मनीला
चपाती देण्या कुस्करून
सय येताच मज गावाची
आठवतो आबांचा मळा
चिंचा न् आवळे खायचे
दुखला किती जरी गळा
मारूदे शाळेमध्ये बाईंनी
वेताची छडीही हातावर
मस्ती करणार आहे खूप
जाताच गावच्या शेतावर
