STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Children

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Children

घड्याळ वाजे टिक टिक

घड्याळ वाजे टिक टिक

1 min
365

घड्याळ वाजे टिक टिक टिक. 

सांगते मला काही शिक.  

संगे माझ्या चाल सदा तू. . 

काल ही मागे तुझ्या पडे

घड्याळ चाले पुढे पुढे....१


तासांच्या ठोक्यांची भाषा

ते गजराचा वाजवी ताशा   

पहाटवेळी गजर ऐकता  

झोप सुखाची क्षणी उडे...२ 


वेळ घड्याळा कोण सांगते?

पायही नसता कसे चालते

घड्याळ थांबे तेव्हा जे शिर

गोंधळ, घरी, बाहेर उडे....३


घड्याळ नसता गाड्या अडती

शाळा भरती आणि सुटती

युगी आजच्या घड्याळाविना

घडोघडी अमुचे अडे....४.    


असते त्याला एकच चावी वेळ,

तारखा, वारही दाखवी

चाल चाल तू मझ्यासंगे

तव भाग्याचे दार उघडे.....५ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children