बालपणीच्या आठवणी
बालपणीच्या आठवणी
1 min
383
लहानपण देगा देवा
रंगून जातो या रम्य आठवणीत
ते सुंदर क्षण आठवून
आनंदून जाते माझे मन
कसं संपलं बालपण
कळले नाही मला ते
आनंदाच्या हिंदोळ्यावर
घेतले झोके डौलाने
किती निरागस मने होती
नव्हता स्वार्थ नव्हती धावपळ
हट्टाने मिळतं असे सारे
मागताच होई पूर्ण सारे
केले मनावर संस्कार थोर
ऐकावं साऱ्याचं,ठेवावा मान
जडण घडण झाली मनावर
संस्कारचा पाया रचिला
बालपणीचा काळ सुखाचा
नसे चिंता, असे गंमत जंमत
स्वछंदी खगाप्रमाणे मन घेई
सदा उंच भरारी आनंदात
