खारूताई
खारूताई
इवलेइवले डोळे तुझे
शेपटी झुपकेदार
मोठे दोन कान तुझे
पळते शानदार
अंगावरील ल्याली केस मऊमऊ.
आवडतो कोणता सांग मला
गोड गोड खाऊ.
बाभळी वर चढते झटपट
काटे नाही का गं टोचत?
उतरतेस पटपट,
आश्चर्य मज वाटत.
पाहतेस डोळे विस्फारून
हलतेस मान डुलूडुलू
पाहता तुझे हे दृश्य,
जाई मी भुलून.
किती गं तू चपळ,
नाही म्हणावं लागे तुला पळ.
आवड तुला झाडपाल्याची,
अशी आवडती तू आमची.
