सावित्री होतीस तू म्हणून
सावित्री होतीस तू म्हणून
होतीस तू म्हणून ,
समाज परिवर्तन झाले.
खितपत पडलेल्या स्त्रीजीवनास ,
बंधनातून मुक्त तू केले .
'चूल आणि मूल' मध्ये गुरफटली होती स्त्री.
काळाच्या पडद्याआड दडलेली
होती स्त्री.
दडलेल्या स्त्रीस आशावाद तू दाखवला .
गंज चढलेल्या तिच्या बुद्धीत अमुलाग्र बदल घडवला .
'स्त्री शिक्षण करमी ', 'समाजसेविका ',लेखिका ,'कवयित्री '
आदी नावांनी तू गाजलीस .
तळागाळातल्या स्त्रियांसाठी ही प्रेरणा तू ठरलीस.
प्रेरणा तुझी मनामनात तेवत राहो ,
पृथ्वीतलावरील स्त्रियांचा उद्धार होत राहो ,
प्लेग साथीतील तुझे दातृत्व आज जगास स्मरले ,
कोरोना साथीत धावून आलेल्या महिला नर्सेस डॉक्टरर्समध्ये ते दिसले .
तुझ्यामुळे स्त्री समाजाच्या जाचक बेड्यांतून आज मुक्त आहे ,
जरी कुठे तिच्यावर होत असेल
अन्याय तर ती तुलाच स्मरत आहे.
आज स्त्रीच्या बाहू कोशात सबंध जग आहे .
जगात गगनभरारी घेणाऱ्या स्त्रियांमध्ये ज्योतिबाची सावित्री दिसत आह.
स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रत्येक स्त्री आज अधीर आहे .
ज्योतिबाची सावित्री म्हणवून घेण्यासाठी ती सज्ज आहे .
यापेक्षा तुझ्यासाठी आनंदाचा दिवस तो कोणता ?
यापेक्षा तुझ्यासाठी आनंदाचा दिवस तो कोणता ?
