STORYMIRROR

Aditya kendre

Inspirational Others

3  

Aditya kendre

Inspirational Others

वृद्धांना द्या आधार

वृद्धांना द्या आधार

1 min
230

नका करू अन्याय आपल्या देशात वृद्धांवर

एके दिवशी व्हाल तुम्ही वृद्ध,

आवर नाही घालू शकत तुम्ही तुमच्या वाढत्या वयावर


हवा वृद्धांना फक्त प्रेमळ शब्द 

जो तुम्ही त्यांना देत नाही

त्यांनाही तुम्हाला पाहिल्याविना दिवस आनंदी जात नाही


तुमच्या वयात त्यांनी, 

किती सोसले असतील उन्हाळे-पावसाळे

विचार केला का कधी त्याचा

विचार केल्यावर येतील प्रेमाचे उमाळे


वृद्ध माता-पित्याची सेवा 

श्रावण बाळाने केली

वृद्ध माता-पित्यांनी दिलाय ना तुम्हालाही मेवा

नसेल का त्यांनाही वाटले श्रावणबाळ आम्हाला हवा


वृद्धाश्रमात ठेवून 

वृद्धांवर अन्याय नका करू 

पाहावं त्यांच्या जागी स्वतःला ठेवून 

म्हणाल पिल्लापासून वेगळा राहून कसा स्वत:ला मी आवरू


आजी-आजोबांच्या प्रेमास नातवांना नका मूकवू

म्हणाल पिल्लांना एके दिवशी प्रेमाचे धडे मी तुला कसे शिकवू ?


करा वृद्धांचा आदर 

म्हणा त्यांना पसरा प्रेमाचा पदर

घ्या नीतिमूल्यांचा आधार हेच आपल्या देशाचे संस्कार


व वृद्धांची काठी 

गाठाल आनंदाने साठी

राहील तुमच्या पिल्लांची साथ तुमच्यापाशी

अशीच राहू द्या देशाची संस्कृती परकीयांसाठी


वागा न्यायाने आपल्या देशात वृद्धांसोबत

वागा न्यायाने आपल्या देशात वृद्धांसोबत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational