STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Children

वळवाचा पाऊस

वळवाचा पाऊस

1 min
464

सोसाट्याचा वारा सुटला  

काळे ढग नभी आले 

विजांचा कडकडाट कडाडला 

पाऊस धरतीवर पडला  


घराचे छप्पर उडाले 

निवारा जलमय झाला

बाया माणसांची धावपळ

जीव घराकडे लागला  


रान सारे बहरले 

पावसाच्या सुंदर सरीने 

पाणी अंगणी साचले 

घेतला आनंद गावाने  


शिळ्या भाकरीची चव 

लागे पोटाला चवदार 

घरी असे विश्व दारिद्र्य 

समाधानी होता परिवार  


मधुनच वीज गायब होई 

दिव्याचा प्रकाश घरभर 

कधी मेणबत्ती, कधी घासलेटचा दिवा 

अभ्यास करी रात्रभर  


नव्हत्या तेवढ्या सोई 

तरी सारे सुखी होते 

आता सर्व काही मिळते 

तरी निराशेचे डोंगर दिसते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children