लेक लाडाची
लेक लाडाची
माझी लेक लाडाची
आहे एकुलती एक
स्वप्न करणार पूर्ण
माझी गुणवान लेक..!
काय फरक असतो
मुलगा आणि मुलीत
शिकून संघटीत होते
बनतात हो सुशिक्षित..!
करा लहानाच मोठं
द्या चांगले संस्कार
करा संगोपण मुलीचे
नाही विसरणार उपकार..!
जरी वंशाचा दिवा
मुलास म्हटले जातात
मुलगी पण आहे एक
जळणारी वात दिव्यात..!
शिक्षण द्या मुलीला
बनवा तिला लक्ष्मीबाई
विनंती करून सांगते मी
मुलीचा जन्म होऊ दे गं आई..!
