आजोळ
आजोळ
आईच्या आईबाबांचा गाव,
'आजोळ' त्याचे नाव. .....
आजोळी असतय कोण कोण,
आजी, आजोबा,मामा दोन. ......
ढवळ्या,पवळ्या,कपिला गाय,
मोत्या भू भू, मनी म्याँव. .......
आंबा, शेवगा, निंबोरा,
अंगणात मोत्याचा पहारा. .....
मामा करतात खूप खूप लाड,
चिडवतात शहरातला पाव्हणा द्वाड. ....
आजी सांगते गोष्टी छान छान,
आजोबांच्या भजणाची सुरेल ताण. ....
नवे मित्र नव नवे खेळ,
कळत नाही,कसा जातो वेळ. .....
दिवसभर दंगा, रात्री अंगणात झोप,
चांदोबा भोवती चांदण्यांचा गोफ. .....
पापड, कुरडई,आमरस पुरी,
आजीची मेजवानी भारी. .....
सुट्टी आली, आजोळी जाऊ,
आनंदाचा ठेवा भरून घेऊ. .....
आजोळ मायेची मऊ गोधडी,
अक्षय सुखाची जणू पोतडी. ......
