ढगोबा ढगोबा
ढगोबा ढगोबा
ढगोबा ढगोबा चाललास कुठं,
पाण्याच्या पखाली नेतोस कुठं. ......
असा कसा जातोस घाई घाई,
आमच्या गावची बघ जरा पाणी टंचाई. ....
कोरडी ठाक पडली तळी, धरणं,
सुकून गेली सारी कुरणं. .......
विहीरी गेल्या कश्या खोल खोल,
एवढीशी नाही जमीनीत ओल. .....
दिवसा आड येतो वस्तीत टॅंकर,
लोटालोटी करत पाणी भरतो भरभर. .....
दे ना आम्हाला पखालभर पाणी,
पाण्यासाठी लोक झालेत दीनवाणी. ....
तू दिसताच आकाशात, वाटते फार बरे,
पावसाच्या आशेने डोळे लावून बसतात सारे.
आम्ही मुलं शोधतो तुझ्यात विविध आकार,
हत्ती,ससा,कासव,तर कधी विठू सगुण साकार..
थांबतोस का आमच्या गावी थोड्यावेळ जरा,
बरसू दे ना सरसर पावसाच्या धारा......
