STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Others Children

4  

Tanvi Raut-Mhatre

Others Children

आजी

आजी

1 min
382

नात्याची तु माझी-आजी.

साद तुला मी घाली-मोठी आई.

आम्ही मांडलेल्या संसारात ह्या 

विचार तुझे ग ठाई-ठाई

आता... सण येतात आणि जातात

पण अस्तित्व तुझे कुठेच नाही

चिंचकडी-भातातील अवीट गोडवा

श्रीखंड पुरीत ही जाणवत नाही

वाळवंटातील निवडुंगास जशी आस पाण्याची

तशी आम्हाला ही आहे ओढ आजोळी जाण्याची

पण,नाही वळत ही पाऊले तिथे जाण्यासाठी

सवयच नाही मम नजरेला तुझ्याविना ते पाहण्याची

आता- नाही तो उत्साह, नाही येत चेहऱ्यावर गोड हास्य

"अग लक्ष्मी !" 

तु आणि तुझ्या नारायणावीना

पोरक्या झालेल्या ह्या मनास 

नाही कशातही स्वारस्य.

पायरीवर पाय पडताच नजर शोधत असते ग तुला

आणि उंबरठ्यातच - डोळा आलेले अश्रु 

वाट करून देतात स्वतः ला

आठवत राहतात काही दुर्मिळ क्षण

तुझ्या सहवासातील मस्तीचे 

येशील का ग पुन्हा, देण्या धडे शिस्तीचे...


Rate this content
Log in