STORYMIRROR

Aruna Garje

Children

4  

Aruna Garje

Children

देणे घेणे

देणे घेणे

1 min
386


घेघेरे घे घे, घेघेरे घे

देदेरे दे दे, देदेरे दे


आळ्यामध्ये पाणी घातले

झाडा तू घे

सावली अन् गोड फळे

आम्हाला दे

    घेघेरे घे घे....


गाई गाई चारा घातला

पटकन खाऊन घे

गोड गोड पौष्टिक दूध

आम्हाला दे

   घेघेरे घे घे.....


आजी आजी पालेभाजी

खूप सारी घे

भूक लागली खूप खूप

जेवायला दे

    घेघेरे घे घे....


आई आई बाळाचा या

गोड पापा घे

गार गार आईस्क्रीम

बाळाला दे

    घेघेरे घे घे....


देवा देवा पेढा दिला

गोड मानून घे

परीक्षेत पहिला नंबर

माझा येऊ दे

   घेघेरे घे घे.... 


घेणे देणे हा तर नियम 

निसर्गाचा असे 

तुम्ही आम्ही यातून सारे 

सुटणार तरी कसे

    घेघेरे घे घे.... 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children