आजीच जुगाड
आजीच जुगाड
आता जुगाडचा जमाना आहे म्हणे
मग मले आठवली आजीच मही
तिचा होता हातखंडा जुगाडात मोठा गड्या
रांधन्यात असो की करण्यात असो
उरल वरन सकाळची कढोल करून घाले
तिच्या हाताले होती चव
मग समदी ते मटक्या मारून खाये
उरल्या पोया रातीकी
त्याचा करे काला
होये तो पोह्या पेक्षा बी खायले भारी
सकाळची ये न्यारी तवा लय व्हती प्यारी
घेऐ दुध फक्त अर्धाच लिटर
त्यातच करे चहा पानी ,त्याचच लावे विरजन
कधिमधि चक्का करे घरचच होत श्रीखंड
तिची राहे कढी पातळ लय
पण त्याची होती चव भारी
आम्ही पिऊ वाट्या चार
समदी होती तृप्त त्यान
जसा हाच पाहुणचार
चोर येईन राती म्हणून
दाराले लावे कडी
कडी होती तुटकी म्हणून
बुढी करे जुगाड --
दाराला लावे पाट ,
त्याच्यावर रचे हंड्डे
हंडड्यावर गडू
हे पाडल चोरान तर
जागतिन सारे खडबडू
तिची तिजोरी बी लयच होती भारी
डाळीच्या डब्ब्यात पत्र्याच्या
ठेवत होती मंगळसुत्र
चोरा पासून लपवण्याच
तव्हा कळत नव्हत तिच सुत्र
नऊवारीची फाटक्या तिच्या होत होती गोदडी
मग चिंध्या होऊन गोधडीच्या बी
होय पायपुसणं
नंतर त्याची वात जाई मग बाटलिच्या टेंभ्यात
कश्याच कराव काय अन कशाच कराव काय??
याच तिच नाँलेज होत लयच हाय ,लयच हाय!
